Saturday 3 December 2011

सांगली जिल्ह्याची एकी व सर्वाच्या पाठीशी राहण्याचा ठामपणा .........

काय झाले पुणे एम.के.सी.एल मिंटीगमध्ये ?


दि. २/१२/२०११ रोजी एम.के.सी.एल पुणे या ठिकाणी एम.के.सी.एल ने तडजोडीसाठी दिलेल्या निमंत्रणा संदर्भात प्रत्यक्ष चर्चाकरणेसाठी मा.विवेक सावंत साहेब यांचेबरोबर टीम सांगली चे प्रतिनिधी मिंटीग साठी उपस्थित होते. सदर मिंटीग ११ वाजता सुरु हो ऊन ३  वा संपुष्टात आली. मिंटीगमध्ये ८०००/- रु  कॉमन मार्केटीग चार्जेस कॅन्सल करणे हाच एकमेव विषय मांडण्यात आला होता.
या विषयासंदर्भात मा.विवेक सावंत साहेब यांचेबरोबर प्रदिर्घ चर्चा व ए.एल.सी ज सदर विषयावर ठाम राहील्यामुळे माननीय विवेक सावंत साहेब यांनी काही तडजोडी सुचविल्या आहेत. या तडजोडीवर चर्चा करुन सर्व ए.एल.सीं चा निर्णय सोमवार दि. ५/१२/२०११ पर्यंत एम.के.सी.एल ऑफ़ीसला कळविण्याचा आहे. उपरोक्त विषया संदर्भात एम.के.सी.एल ने सुचविलेल्या तडजोडीवर चर्चा करुन सर्वमान्य असा निर्णय घेण्यासंदर्भात रवि.दि. ४/१२/२०११ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता मा.श्री इर्शाद सर यांच्या व्ही.पी कॉलेज , देवल टॉकीज जवळ मिरज येथे मिंटीग आयोजीत केली आहे. तसेच सदर निर्णय हा सर्व ए.एल.सी ज च्या सर्वानुमते घेण्यात येणार असल्यामुळे सर्व ए.एल.सीज हि मिंटीग सर्व ए.एल.सी. नां कंपसरी ऊपस्थित राहणे अनिवार्य आहे.
सांगली जिल्ह्यातील ए.एल.सीज च्या प्रयत्नांना इतर जिल्ह्यामधूनही प्रचंड सपोर्ट मिळत आहे. तरी इतर जिल्ह्यातील ही ए.एल.सीज ही सदर मिंटीग साठी उपस्थित रहाण्याचे आवाहन करीत आहोत. सदर मिंटीग मध्ये होणा-या निर्णयाच्या अगोदर कोणीही ई.ओ.आय किंवा ई.पी.आय करु नये हि विनंतीतरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे व पुर्वीसारखाच पाठिंबा द्यावा हि नम्र विनंती.
अधिक माहितीसाठी तातडीने संपर्क करा
 मा.जावेद पटेल सर - प्रतिनिधी सांगली जिल्हा. मोबाईल. ९३२५६६६२२३,
मा.गणेश चव्हाण सर - ९०२८८३५९९४
मा.ईर्शाद शेख सर - ९४२२०४१५८२
मा.स्वप्नील शहा सर - ९८२२२८६०५५
मा.प्रकाश भंडारे सर - ९८८१०३४२६०

No comments:

Post a Comment